भारतीय मजदूर संघ ६९ वा वर्धापन दिनच्या निमित्ताने कामगार मेळावा

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :  23 जुलै २०२४ रोजी  भारतीय मजदूर संघ ७० व्या वर्षात पदार्पण करत आहे त्यामुळे भारतीय मजदूर संघ, पुणे  जिल्हाच्या वतीने २३ जुलै २०२४  वार मंगळवार रोजी ६९ वा वर्धापन दिनाचा कार्यक्रम सायंकाळी ०5 वा  एस  पी काॅलेज च्या लेडी रमाबाई सभागृह त कामगार मेळावा आयोजित केला आहे. 

या कार्यक्रमासाठी  प्रमुख वक्ते म्हणून  श्री तुकाराम डिंबळे  सेक्रेटरी अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघ असून , पुणे जिल्हा मधील  विद्युत,  बॅंक , संरक्षण,  दूरसंचार, रेल्वे,  खाजगी ऊद्योग,  बीडी कामगार,  घरेलु,  सुरक्षा रक्षक, वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगार,  एल पी जी प्लँट मधील कंत्राटी कामगार, बांधकाम,  घरेलु,    इतर उद्योगातील कामगार उपस्थित राहणार आहेत.  

भारतीय मजदूर संघ च्या 70 वा स्थापना दिनाच्या निमित्ताने भारतातमध्ये सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  याचा मुख्य कार्यक्रम भोपाळ येथे आयोजित केला असून येथे केंद्रीय पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत.  

विविध ठिकाणी संघटना नाम फलकाचे पुजन,  निर्धार मेळावा,  आरोग्य तपासणी शिबिर,  रॅली,  संर्पक मोहीम, आदी कार्यक्रम चे नियोजन केले आहे.  

तरी भारतीय मजदूर संघ च्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने होणारे मेळावा मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ही विनंती भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष श्री अर्जुन चव्हाण व अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी केले आहे.  अशी माहिती  प्रसिद्धी प्रमुख सागर  यांनी दिलेली  आहे.  


सचिन मेंगाळे 

सरचिटणीस 

अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ  संलग्न भारतीय मजदूर संघ 

9422037029 

sachinmbms@gmail.com

Post a Comment

Previous Post Next Post