'नेत्र आरोग्य ठरणार जनजागृतीचा विषय':डॉ.केळकर

नेत्रतज्ज्ञांच्या राष्ट्रीय परिषदेमध्ये डॉ. श्रीकांत केळकर यांचा सहभाग

प्रेस मीडिया लाईव्ह :

 पुणे : देशभरातील नेत्रतज्ज्ञांच्या 'इंडियन इंट्राऑक्युलर इम्प्लांट अँड रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी कन्व्हेंशन -२०२४' या राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेमध्ये पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफथाल्मोलॉजी चे संस्थापक आणि ज्येष्ठ नेत्रशल्यचिकित्सक  डॉ. श्रीकांत केळकर  सहभागी झाले. इंडियन इंट्राऑक्युलर इम्प्लांट अँड रिफ्रॅक्टिव्ह सोसायटी ऑफ इंडिया च्या वतीने दि.६ आणि ७ जुलै रोजी ही परिषद आयटीसी ग्रॅंड चोला(चेन्नई) येथे आयोजित करण्यात आली. पहिल्या दिवशी या परिषदेमध्ये चर्चासत्रांचे अध्यक्षपद केळकर यांनी भूषवले, तसेच मार्गदर्शन केले. 

 देशभरातून ४ हजार नेत्रतज्ज्ञ उपस्थित होते.डॉ.केळकर यांनी यापूर्वी इंडियन इंट्राऑक्युलर इम्प्लांट अँड रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी कन्व्हेंशन चे अध्यक्षपद भूषविले आहे.नवीन तंत्रज्ञानविषयक चर्चासत्रे,व्याख्याने,लाईव्ह सर्जरी,हॅन्ड्स ऑन वेटलॅब,परदेशी तज्ज्ञांचे मार्गदर्शन या परिषदेत आयोजित करण्यात आले होते. 

'नेत्रशस्त्रक्रिया आणि तंत्रज्ञान याबाबत ज्ञान अद्ययावत करत राहिले पाहिजे.नेत्रचिकित्सा आणि शस्त्रक्रियेत आर्टिफिशयल इंटेलिजन्स,मशीन लर्निंग,व्हर्चुअल रिआलिटी उपयुक्त ठरेल अशी माहिती डॉ.केळकर यांनी दिली. 

'जीवनशैलीतील बदल,प्रदूषण,इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा अतिवापर यामुळे दृष्टीवर दुष्परिणाम होत असल्याने डोळ्यांची काळजी,नेत्रआरोग्यविषयक जागृती घडवून आणली पाहिजे. नेत्र आरोग्य हा आगामी काळात जनजागृतीचा विषय ठरणार आहे ',असेही डॉ.केळकर यांनी या परिषदेत सांगितले. 



Post a Comment

Previous Post Next Post