आदर्श शिक्षिका सौ. स्वाती वानखेडे यांना यंदाचा ‘सावित्री’ पुरस्कार जाहीर

प्रेस मीडिया लाईव्ह : 

‘सावित्री फोरम’तर्फे आदर्श शिक्षिका सौ. स्वाती वानखेडे यांना आदिवासी पाड्यांमध्ये शाळा चालवून आदिवासी मुला – मुलींना गेली ३० वर्षाहून अधिककाळ शिक्षण देण्याचे  कार्य केल्याबद्दल ‘सावित्री’ पुरस्कार देऊन गौरवले जाणार आहे. ५ हजार रुपये, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 

याबरोबरच १००  विद्यार्थिनींना एकूण सुमारे 1 लाख रुपयांची शैक्षणिक मदतही देण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सौ.नीला विजय कदम यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. हा कार्यक्रम बुधवार  दि. २४  जुलै रोजी सायं ५  वाजता जवाहरलाल नेहरु ऑडिटोरियम, घोले रोड, पुणे येथे संपन्न होईल अशी माहिती सावित्री फोरमच्या सचिव संयोगिता कुदळे यांनी दिली. 

 आदर्श शिक्षिका सौ. स्वाती वानखेडे  यांनी नाशिक जवळील शेरपाड्यातिल जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून सलग ३० वर्षे हजारो गरीब मुला – मुलींना शिकवले. गावात जायला रस्ता नाही अशा वेळी जंगलातून वाट काढीत त्या शाळेत पोहचत. मुलांना शिक्षणाबरोबरच सुसंस्कारित करण्यावरही त्यांचा भर होता. त्यांच्या या पायाभूत व अलौकिक कार्याबद्दल अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले गेले तसेच न्युझीलंड  मध्ये देखील ‘सी.ओ.एल’ पुरस्कार देऊन त्यांना या कार्याबद्दल गौरण्यात आले.

 कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या असणाऱ्या सौ.नीला विजय कदम या पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका असून, दूरदर्शन, आकशवाणी, बालचित्रवाणी यामध्ये त्यांचे अनेक कार्यक्रम सादर झाले आहेत. अनेक सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार असतो. आदर्श शिक्षिका पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे.

    सन २०१५ मध्ये ‘सावित्री फोरम’ संस्था नोंदणीकृत ट्रस्ट म्हणून स्थापन केली गेली. तेव्हापासून दरवर्षी ७५ मुलींना सुमारे 1 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ‘सावित्री’ हा पुरस्कार मागीलवर्षी पासून सुरु करण्यात आला आहे. सावित्री फोरमतर्फे महिलांच्या उन्नतीसाठी अनेकविविध कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षी सातत्याने केले जाते. आरोग्य शिबिरे, महिला उद्योजकांसाठी प्रदर्शन, सॅनिटरी पॅडचे वाटप, रक्तदान शिबिर, कपडे गोळा करून गडचिरोलीला पाठवणे, अनाथाश्रम व वृद्धाश्रमात खाऊ वाटप व करमणूकीचे कार्यक्रम, महिलाश्रम येथे कपडे, चादरी वाटप, दंत चिकित्सा शिबिर, मेकअप वर्कशॉप, सायबर क्राईम अवेयरनेस, आहार व आरोग्य, मॉकटेल सरबते बनवणे, राखी, आकाशकंदील, पॉट गार्डन बनवणे, व्याख्याने, फॅशन शो, रंगारंग कार्यक्रम, वार्षिक सहल असे अनेक उपक्रम सावित्री फोरमतर्फे दरवर्षी आयोजित केले जातात असे सचिव संयोगिता कुदळे यांनी सांगितले. 

आपली स्नेहांकित, 


 संयोगिता कुदळे                             

प्रवीण प्र. वाळिंबे

सचिव    माध्यम समन्वयक

  सावित्री फोरम                    ९८२२४५४२३४ / ७३८७००२०९७

9921030001

सुप्रिया ताम्हाणे

९८८११४९९९५

Post a Comment

Previous Post Next Post