...... तर वसंत मोरें विरोधात कडक कारवाई करावी" ---साईनाथ बाबर

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :  वसंत मोरे  व मनसे अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यातील संघर्ष चांगलाच पेटल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणानंतर वसंत मोरे यांच्या समर्थकांनी सोशल मीडिया मनसे पदाधिकाऱ्यांबाबत वर अपमान जनक भाषा वापरल्याने मनसेने मोरेंच्या समर्थकांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच साईनाथ बाबर यांनीदेखील वसंत मोरेंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. धक्कादायक म्हणजे वसंत मोरेंना धमकी देणारी व्यक्ती ही त्यांच्याशीच संबंधित असू शकते असा दावा बाबर यांनी केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहरचे कोथरूड विधानसभेचे अध्यक्ष सुधीर धावडे यांनी फेसबुक या समाज माध्यमावर हवामान खात्याने दिलेल्या अंदाजा संदर्भात केलेल्या एक पोस्टर केली होती. या पोस्टवर आलेल्या कमेंटनुसार वसंत मोरे आणि त्यांच्या साथीदारांविरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे. या प्रकरणात पोलीस कारवाई करत आहेत. तर पुणे शहराचा अध्यक्ष या मी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांकडे कारवाईची मागणी केली. यामुळे चिडलेल्या वसंत मोरेंनी हे काही महिन्यांपूर्वी आलेल्या एका फोन कॉलवरून पोलिसांकडे तक्रार केली असून ते हेतूपरस्पर आरोप करीत आहेत", असा आरोप साईनाथ बाबर यांनी पत्रात केला आहे.

"ही बाब अत्यंत गंभीर असून फोन कॉल करणारी व्यक्ती वसंत मोरेंशी संबंधित असण्याची मोठी शक्यता आहे त्यामुळे सबंधित गुन्ह्याचा सखोल तपास करावा. 

यातील आरोपी जर यांच्याशीच संबंधित असेल तर वसंत मोरें विरोधात  कडक कारवाई करावी", अशी मागणी साईनाथ बाबर यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post