केंद्रीय अर्थसंकल्पात मोदी सरकार कडून महाराष्ट्राला सावत्र आईची वागणूक : प्रशांत जगताप


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे  : नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात मोदी सरकारने महाराष्ट्राला सावत्र आईची वागणूक दिली आहे. एकीकडे बिहारला 60 हजार कोटी रुपये, आंध्र प्रदेशला 15 हजार कोटी रुपये वाटण्यात आले, तर सर्वाधिक कर भरणाऱ्या महाराष्ट्राची पाटी रिकामी ठेवली गेली आहे . सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जिल्हा दंडाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून सत्तेत असलेल्यांचा तीव्र निषेध केला. किशोर कांबळे, शेखर धावडे, मृणालिनी वाणी, सुरेखा धमिष्टे, नीता गलांडे, पूजा काटकर, मीना पवार, अप्पा पवार, स्वाती चिटणीस, शैलेंद्र राजगुरू, गणेश नलावडे, रमीज सय्यद आदींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनात सहभाग घेतला. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान महाराष्ट्राच्या गद्दारांना धडा शिकवू, भाजपने महाराष्ट्राला लुटून बिहारचे खिसे भरल्याचे सत्य समोर आले आहे, महाराष्ट्रातील गद्दारांना सीमेपलीकडे पाठवू, अशा घोषणा देण्यात आल्या.

प्रशांत जगताप म्हणाले की, केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला अत्यंत अन्यायकारक वागणूक देण्यात आली आहे. संपूर्ण अर्थसंकल्पात महाराष्ट्राचे नाव एकदाही घेतले गेले नाही, इतिहासात प्रथमच अशी घटना अर्थसंकल्पात घडली आहे. देशाच्या तिजोरीत सर्वाधिक पैसा महाराष्ट्रात जमा होतो हे सर्वांनाच माहीत आहे. असे असतानाही बिहार आणि आंध्र प्रदेशच्या अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात निधी वितरित करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राला सापत्न वागणूक देणाऱ्यांचा हिशोब जनतेला द्या, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post