प्रेस मीडिया लाईव्ह :
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मुजोर अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांना पिंपळे निलख येथिल आदर्श नगर परिसरातील रस्ता अनेक दिवसांपासून खोदाई करण्यात आली आहे आणि सदर रस्त्याचे काम आमदार विकास निधीतून केले जाणार आहे.परंतु सदर काम गेली एक महिना ठप्प आहे रस्ता खोदाई करून ठेवला आहे.
त्यासंदर्भात विचारण्यासाठी मुजोर अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांना फोन केला असता.फोनवर बोलण्यासाठी सुद्धा तुम्ही सारथी वर तक्रार करा असे मुजोरीत सांगितले आणि सारथीवर तक्रार करायची नसेल तर आॅफिसला येऊन भेटायचं अस मुजोरीत सांगितले .मी पुन्हा त्यांना उलट प्रश्न केला मला अतिरिक्त आयुक्त यांच्याशी फोनवर बोलायचे असेल तर सारथीवर तक्रार करायची काय गरज तर मुजोर अतिरिक्त आयुक्तांनी मला असे सांगितले की हा माझा वैयक्तिक नंबर आहे (9604480555) पालिकेने दिलेला नाही त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींची फोनवर दखल घेण्यासाठी मुजोर अतिरिक्त आयुक्तांना आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत जाऊन प्रतिकात्मक सिमकार्ड भेट दिले.जेणेकरून आम्हाला त्यांना फोनवर तक्रार करता येईल आणि पालिकेतील इतर कोणत्याही अधिकाऱ्यांना सिमकार्ड दिले नसेल तर येत्या दोन दिवसांत सिमकार्ड द्यावे.मुजोर अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांना समज द्यावी.आपण केलेल्या कारवाई संदर्भात आम्हास लेखी उत्तराद्वारे कळवावे असे रविराज काळे म्हणाले त्यावेळी उपस्थित प्रकाश घोडके, अभिजित कदम होते.
रविराज बबन काळे
सदस्य आम आदमी पार्टी
पिंपरी चिंचवड
9673268485