महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व माजी अध्यक्ष अल्पसंख्यांक आयोग अध्यक्ष श्री. मुनाफ हकीम यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभ संपन्न

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई, २० जुलै २०२४: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व माजी अध्यक्ष अल्पसंख्यांक आयोग श्री. मुनाफ हकीम यांच्या वाढदिवसानिमित्त  टिळक भवन, मुंबई येथे एक विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात श्री. हकीम यांचा सत्कार करून त्यांच्या वाढदिवसाचा केक कापण्यात आला.

या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अनेक ज्येष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री. नाना भाऊ पटोले व प्रदेश कांग्रेसचे अनेक जेष्ठ नेते होते. 


 या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव डॉ. हाजी जाकीर शेख, श्री. आफताब शेख (सचीव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी), प्रदेश कार्यालय अधिक्षक श्री. नामदेव चव्हाण, डॉ. गजानन देसाई, श्री. राम विजय मुरुंगळे, श्री. रिजवान हकीम, श्री. अशोक इटकर, श्री. शहबाज शेख, श्री. अबुलेस शेख, श्री. जव्वाद चिखलेकर, श्री. इरफान पटेल आणि श्री. हसीब नदाफ यांचा समावेश होता.

कार्यक्रमादरम्यान श्री. मुनाफ हकीम यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केलेल्या कामगिरीची प्रशंसा करण्यात आली. उपस्थित नेत्यांनी श्री. हकीम यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post