कोयत्या हल्ल्यातील जखमी वृध्दाचा मृत्यु.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- कागल तालुक्यातील करनूर येथे कोयता हल्ल्यात गंभीर जखमी झालेला गुलाब बाबालाल शेख यांचा सीपीआर रुग्णालयात उपचार चालू असताना गुरुवार दि.11/07/2024 रोजी रात्री एकच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

अधिक माहिती अशी की ,सोमवार दि.08/07/2024 रोजी करनूर येथे शेख मळा परिसरात सायंकाळी सातच्या 

 गुलाब शेख यांच्या डोक्यात कोयता मारल्याने त्यात ते गंभीर जखमी जखमी झाले होते.त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी प्रथम कागल येथे शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.त्यांच्या डोक्यात मारलेला कोयता अडकल्याने त्याना पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.या खुनी हल्ला झाल्याची नोंद कागल पोलिस ठाण्यात झाली असून यातील हल्लेखोर गायब असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत पण हलेखोर अजून पोलिसांना  सापडले नाहीत.

घटना स्थळी मंगळवारी करवीर उपविभागीय पोलिस अधिकारी श्री .निकेश खाटमोडे -पाटील व कागल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी घटना स्थळी भेट दिली होती.रस्त्यावर पडलेल्या रक्ताच्या डागाची पहाणी करून पुढ़ील तपासासाठी मार्गदर्शन केले.सदरची घटना कोणत्या कारणामुळे घडली याचा उलगडा हल्लेखोर सापडल्या नंतरच होणार असून हा हल्ला आर्थिक व्यवहारातुन झाल्याची चर्चा असल्याची समजते.कागल पोलिसांनी करनूर आणि कोगनोळी येथील काहीना बोलवून चौकशी केल्याचे समजते.

Post a Comment

Previous Post Next Post