प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- विशाळगड येथे अतिक्रमण केलेली बांधकामे काढ़ुन घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याने त्या परिसरात कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने शाहुवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांनी मंगळवार दि.16/07/2024 रोजी उप विगाभागीय अधिकारी ,पन्हाळा यांच्या कडे अहवाल सादर करुन कळविले असल्याने किल्ला विशाळगड परिसरात कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता असल्याने
पन्हाळा विभागाचे उपविभागीय दंडाधिकारी समीर शिंगटे यांनी पांढ़रे पाणी ते गजापूर रस्ता ,तसेच गजापूर पैकी वाणीपेठ (मुसलमान वाडी) ते विशाळगड पायथा आणि संपूर्ण विशाळगड किल्ला भागात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 223चे 163 च्या कलमानुसार बुधवार दिनांक 17/07/2024 रोजी सकाळी सहा वाजल्या पासून ते शुक्रवार दि.19/07/2024 .रात्री बारा वाजे प्रर्यत बंदी आदेश लागू केला आहे.या मध्ये शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना वगळून नागरिकांना किल्ला विशाळगड आणि त्या परिसरात जाण्यास बंदी घातली आहे.