पत्रकारांच्या कल्याणासाठी त्यांच्या असलेल्या अडचणी दुर करणार - नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर -पत्रकारांच्या असलेल्या अडी अडचणी आणि त्यांच्या कल्याणासाठी संपूर्ण राज्यभर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ ,मुंबई याचा विस्तार झाला असून या संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र संघटक मा.संजय भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दि.03/07/2024 रोजी एंपायर टॉवर येथे बैठकीचे आयोजन केले होते.

या निमीत्ताने झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष म्हणुन दै.पुण्यनगरीचे चंद्रकांत पाटील ,दै.तरुण भारतचे कृष्णात पाटील उपाध्यक्षपदी तर सचिव माझा महाराष्ट्रचे संपादक सुरेश पाटील व कार्याध्यक्षपदी मराठी 24 चे संपादक दत्तात्रय बोरगे आणि शहराध्यक्ष पदी बी .न्युजचे प्रमोद व्हनगुत्ते यांची निवड करण्यात आली.पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष श्रेयस भगवान यांच्या देखरेखीखाली नवीन कार्यकारिणी पार पडली.

या कार्यकारिणीला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन संघटक मा.संजय भोकरे यांनी दिले .या वेळी प्रथमेश कात्रट ,अर्पणा पाटील ,निरंजन कामत,नाझ अत्तार ,मुरलीधर कांबळे,अझर मुल्ला ,नरेंद्र देसाई,रुपाली चव्हाण ,सुरेखा शेजाळे,मधु धनवडे,आणि आकाश कांबळे यांच्यासह  पत्रकार संघाचे इतर कार्यकारी पत्रकार  सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post