नदीकाठच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाय योजना करा. महापालिका प्रशासनाला सूचना..... आयकॉन कृष्णराज महाडिक.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर लावला असून पुराच्या पाण्यात झपाट्याने वाढ होत असून   धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू आहे.अशा नदीकाठच्या ठिकाणी असलेल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाय योजना कराव्यात अशा सूचना आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाला देऊन महापालिकेच्या अधिकारयां सोबत शुक्रवार पेठ परिसराची पाहणी केली.


पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे चालू असून नदीकाठच्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.पुराच्या पाण्याचा फ़टका बसत असलेल्या परिसरात फ़ेरफ़टका मारुन त्यांच्या मदतीसाठी पाहणी केली.या परिसरातील गायकवाडवाडा,जगद्गुरु शंकराचार्य मठ,आणि गवत मंडई येथे अगोदर पुराचे पाणी येत असल्यामुळे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे,अग्निशामक दलाचे मनिष रणभिसे यांच्यासह कर्मचारी आणि आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी या परिसरात असलेल्या कुंटुंबियाची भेट घेऊन चौकशी केली.

पुराच्या पाण्याने रोगराई पसरण्याची शक्यता असल्याने या भागात औषध फवारणी करून धूराची फवारणी करण्याच्या सूचना दिल्या.तसेच येथील नागरिकांच्या स्थलांतरीत ठिकाणीची पहाणी करण्यात आली.या वेळी आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी नागरिकांच्या मदतीसाठी मित्र परिवारसह सदैव तयार असल्याची माहिती दिली.स्थलांतरीत झालेल्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होतो की नाही ही जबाबदारी आपल्या मित्र परिवारावर सोपवण्यात आल्याचे सांगितले.

यावेळी जयदिप घरपणकर ,राज माने,पृथ्वीराज मोरे,कृणाल भणगे ,विशाल शिराळे,सुमित चौगुले,हरिश पाटील आणि सिध्दार्थ शिराळे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post