विषारी औषध घेतल्याने उपचारास दाखल.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर-कागल तालुक्यातील गोरंबे येथे रहात असलेल्या सुनिता शामराव वास्कर (वय 46)  यांनी शनिवार दि.13/07/20 रोजी रात्री साडे आठच्या सुमारास रहात्या घरात नजरचुकीने खोकल्यांचे औषध समजून गोल नावाचे किटकनाशक घेतल्याने त्यांना उपचारासाठी त्यांच्या नातेवाईकांनी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले .हा प्रकार घरातील लाईट गेल्याने अंधारात घडल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

----------------------------------------

मोटारसायकलच्या मागच्या चाकात पदर अडकून पडल्याने महिला जखमी.

निपाणी -चिकोडी तालुक्यातील सिदनाळ येथील वंदना भिमराव कांबळे (वय 60)  या शुक्रवार दि.12/07/2024 रोजी दुपारी तीनच्या सुमारास मोटारसायकल वरुन जात असताना मागच्या चाकात साडीचा पदर अडकून खाली पडल्याने त्यांच्या नातेवाईकांनी निपाणी येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी  सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

----------------------------------------

 कुत्रे आडवे आल्याने मोटारसायकल स्वार जखमी.

कोल्हापूर-व्हिनस कॉर्नर परिसरात असलेल्या हॉटेल व्हरायटी जवळ मोटारसायकल वरुन जात असताना  कुत्रे आडवे आल्याने जाफर हुसेन मकानदार (वय 25.रा .साने गुरुजी,कोल्हापूर) हा मोटारसायकल वरुन खाली पडल्याने त्याला उपचारा साठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.हा प्रकार शनिवार दि.13/07/2024 रोजी रात्रीच्या सुमारास घडला होता.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

--------------------------------------

अपघातात एक जण जखमी.

कोल्हापूर-कागल तालुक्यातील कं.सांगाव येथील बसवराज मल्लापा हादिमणी (वय 43.) हे शनिवार दि.13/07/2024 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास हॉटेल डायमंड समोर झालेल्या रोड अपघातात जखमी झाल्याने त्याला सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

-------------------------------------

अपघातात महिला जखमी.

मुरगूड -वाघापूर येथील सुनिता उत्तम आरडे(वय 32.रा.वाघापूर ) यांचा रविवार दि.14/07/2024 रोजी दहाच्या सुमारास हेदवडे ते कापशी रोडवर गावच्या परिसरात दुचाकी वरुन पडल्याने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post