कोल्हापूर येथे पोलिसांचा धार्मिक स्थळी मोठा बंदोबस्त.

    विशाळगड येथे झालेल्या प्रकरणी कोल्हापुरात पोलिसांची दक्षता.

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- खा.संभाजीराजे यांनी चलो विशाळगड अशी हाक दिली होती.त्यामुळे विवीध ठिकाणाहून कार्यकर्ते मोठ्या संख्येने विशाळगडला रवाना झाले होते.त्यावेळी विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यानी हुल्लडबाजी करत अनेक ठिकाणी वाहनांची तोडफोड करून दगडफेक करून एका ठिकाणी घर जाळल्याचा प्रकार घडला आहे.त्यातच एका कार्यकर्त्याने थेट एका पोलिस कर्मचारी यांच्या तलवार हल्ला करून जखमी केल्याचा प्रकार घडला आहे.यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.याची खबरदारी म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात याचे पडसाद उमटू नये म्हणून जिल्हयातील धार्मिक ठिकाणासह चौका -चौकात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.या साठी रात्रीच्या सुमारास गस्तही घातली जात होती.यावेळी संशयास्पद फिरत असलेल्यांची पोलिस विकारणा करीत होते.

मा.खा.संभाजीराजे यांनी वेळोवेळी प्रशासनाला विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी वेळोवेळी सूचना देऊनही अतिक्रमण हटविण्यात आले नसल्याने मा.खा.संभाजीराजे यांनी विशाळगडावर जाऊन छ.शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन विशाळगडाकडे आगे कूच केली.या त्या परिसरात असलेल्या हॉटेल,घरे यांना लक्ष करत दगडफेकीचे प्रकार घडले.या दगडफेकीत काही जणांचे प्रापंचिक साहित्यासह वाहनांचे नुकसान झाले आहे.यासाठि पोलिसांना सौम्य लाठीमार करून आंदोलकांना पांगविले.

या वेळी वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

Post a Comment

Previous Post Next Post