प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- संपुर्ण महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्ह्यात लक्ष लागून राहिलेल्या आणि पोलिस दलात मोठी खळबळ माजवलेल्या सहा.पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे -गोरे यांच्या खून खटल्याची सुनावणी शेवटच्या टप्प्यात आली असून यातील मुख्य आरोपी बंडतर्फ पोलिस निरीक्षक अभय कुंरुदकर याच्यासह राजेश पाटील,कुंदन भंडारी व महेश फळणीकर यांचा जबाब पूर्ण झाला असल्याने 26 जुलै पासुन बचाव पक्षाच्या आणि सरकारी पक्षाच्या दोन्ही बाजूने युक्तीवाद होणार असून दोन्ही बाजूचा युक्तीवाद पूर्ण झाल्यावर या खून खटल्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे.
बंडतर्फ पोलिस निरीक्षक अभय कुंरुदकर याने आपल्या साथीदारांची मदत घेऊन दि.11/04/2016 रोजी सहा.पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे यांची मिरा रोड येथे त्यांच्यावर हत्या केल्याचा आरोप असून घटना घडल्या पासून दिड वर्षा नंतर म्हणजे दि.07/12/2017ला अभय कुंरुदकर यांना अटक झाली होती.त्याच्या नंतर तीन चार दिवसांनी संशयीत राजेश पाटील यांला पोलिसांनी अटक केली होती.त्याच्या नंतर 2018 च्या फेब्रुवारी महिन्यात महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी या दोघांना अटक केली होती.
या घटनेचा तपास सहा.पोलिस आयुक्त संगीता अल्फान्सो यांनी केला होता.पनवेल येथील सत्र न्यायालयात 2019 पासून या खून खटल्याचे कामकाज चालू होते.या खटल्यात 85 साक्षीदार तपासले असून यात अश्विनी बिद्रे-गोरे यांचा भाऊ अनंत बिद्रे,पती राजू गोरे यांचा समावेश आहे.
या खटल्यातील सर्व साक्षीदारांच्या साक्षी तपासल्यानंतर 313 नुसार सर्व आरोपीचे जबाब नोंदणीचे काम पूर्ण झाले असून 26 जुलै पासून
दोन्ही बाजूच्या वकीलांचा युक्तीवादाला सुरुवात होणार आहे.या अति भयंकर पध्दतीने खून झालेल्या निकालाकडे पोलिसदलासह सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.