कोल्हापूर : साने गुरुजी येथे धाडसी चोरी.

 बंगल्यात प्रवेश करून दीड लाखांच्या रक्कमेसह 15 तोळे दागिने लंपास .

प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर- साळोखेनगरातील संजय श्रीपती पाटील यांच्या बंगल्यात प्रवेश करून चोरट्यांनी दिड लाखांच्या रोख रक्कमेसह 15 तोळे दागिन्याची चोरी करून पसार झाले.हा प्रकार सोमवारी (दि.22) रोजी उघडकीस आला.

या घटनेची माहिती संजय पाटील यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली.घटना स्थळी पोलिसांनी श्वानपथकासह गेले असता त्यांना सुगावा लागला नाही.संजय पाटील हे मित्र परिवारासह शेगाव येथे देवदर्शनासाठी गेले होते.चोरट्यांनी या बंद असलेल्या बंगल्यात प्रवेश करून कटावणीने लोखंडी कपाट उचकटून त्यातील सोन्याचे गंठण ,रिंगा ,टॉप्स ,झुबे आणि अंगठ्यासह त्यातील रोख दीड लाख रुपये असा एकूण सात लाखांपेक्षा जास्त किमंतीचा मुद्देमाल लंपास केला.हा प्रकार आस पासच्या लोकांना समजताच संजय पाटील यांना फ़ोन वरुन माहिती दिली.या घटना स्थळी शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके ,जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे संजीव झाडे ,स्थानिक गुन्हे अन्वेषनचे रविंद्र कळमळकर यांनी पहाणी करून माहिती घेतली.पोलिसांनी काही पथके तयार करून चोरट्यांच्या मागावर गेले.या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post