प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - एकमेकाचे मित्र असलेल्या दुचाकी लावण्याच्या कारणातुन वाद झाल्याने एकमेकांना शिवीगाळ करुन झालेल्या मारहाणीत तिघां जणांनी एकास मारहाण करून डोक्यात दगड घालुन ओढ़यात ढ़कलून दिल्याने अमोल भारत जानराव (वय 32 रा.कात्यायनी कॉम्पलेक्स,कंळबा) हा जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले .ही घटना मंगळवार दि.30/07/2024 रोजी दुपारच्या सुमारास घडली असून या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
अधिक माहिती अशी की ,मंगळवारी दुपारच्या सुमारास रामानंदनगर येथे असलेल्या ओढ़याजवळ काही जण बोलत थांबले होते.त्यांनी त्या वेळी मद्यपान केले होते.त्यांच्यात दुचाकी लावण्यावरुन वाद होऊन मारहाण झाली.यात अमोल याला काही तरुणांनी मिळुन बेदम मारहाण करत त्याच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले .या वेळी अमोलने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण यांच्या पुढ़े काही त्याचे चालले नाही.या मारहाणीत अमोलला ओढ़यात खाली ढ़कल्याने तो खाली पडला असता तो मृत झाला असावा असे समजून त्यांनी पळ काढला.जखमी अमोलला त्याच्या मित्रांनी कार मध्ये घालून उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले .
घटना स्थळी जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे आणि पोलिस पथकानी सीपीआर रुग्णालयात भेट देऊन जखमीची विचारपूस करत माहिती घेऊन हल्लेखोरांच्या मागावर गेले.यातील हल्लेखोर मोरेवाडी परिसरातील असल्याचे समजते.या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत झाली नव्हती.