रोटरी क्लब आणि भागीरथी संस्थेच्या माध्यमातून कळी उमलताना कार्यक्रमाचे आयोजन.

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - करवीर तालुक्यातील वळीवडे येथे शाळेतील विद्यार्थीनी साठी आरोग्याची काळजी घेण्यासाठी कळी उमलताना या कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन आणि भागीरथी संस्थेच्या माध्यमातून केले होते.आरोग्य संवर्धनासाठी नियमीत पोषक आहार आणि व्यायाम करून स्त्रीयांनी कुंटुंबांची काळजी घेत स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.खास करून वयात येत असलेल्या तरुणीनी आरोग्याबद्दल जास्त जागरुक राहिले पाहिजे असे मत रोटरीचे सेक्रटरी बाळकृष्ण शिंपुगडे यांनी व्यक्त केले.कळी उमलताना या कार्यक्रमात ते बोलत होते.भागीरथी संस्थेने शालेय विद्यार्थीनीना आरोग्याबद्दल जागरुक रहात कुंटुंबांचे आरोग्य जपत असताना स्वतःचीही काळजी घ्यावी.असे आवाहन करण्यात आले.तरुण वयात होणारे शारिरीक बद्दल तसेच परिपूर्ण स्त्री बनताना मुलीनी शारिरीक बदलांना सामोरं जावे असे प्रतिपादन प्राध्यापिका रुपा कुलकर्णी यांनी केले.मुलींच्या विचारलेल्या प्रश्नाला प्रा.कुलकर्णी यांनी उत्तरे दिली.या वेळी मुख्याध्यापक मनोहर पवार ,शिक्षक प्रदिप पाटील,भाजपाच्या सुलोचना नार्वेकर ,राजगोंडा झुणके यांनीही आपली मते मांडली.

या कार्यक्रमाला प्रतिभा शिंपुगडे ,विजयालक्ष्मी संबर्गी ,विजय खांडेकर ,सारिका पोवार,संगीता पांढ़रे,जयश्री पोवार ,अर्पिता खांडेकर ,निलम साळोखे यांच्यासह पालक व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांना ग्रंथ आणि वृक्ष भेट देऊन शाळेच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

----------------------------------------

आजचा केंद्रीय अर्थसंकल्प आत्मनिर्भर भारत आणि विकसीत भारत या संकल्पनेला मृतस्वरुप देण्यासाठी महत्वाचा आहे. शेतकरी ,नोकरदार ,महिला ,युवक ,उद्योजक आणि गोरगरिबांच्या अपेक्षांचा आणि गरजांचा विचार करून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितामनरंजन यांनी हा परिपूर्ण अर्थसंकल्प सादर केला.पायाभूत सुविधांसाठी 11लाख कोटी रुपयांची तरतूद म्हणजे देशांच्या विकासांचा भक्कम पाया आहे.आणि शेतकरीवर्गाला ही मोठा दिलासा मिळाला आहे.रोजगार ,कौशल्य विकास ,शिक्षण ,शहरी विकास ,गोरगरीब जनतेसाठी घरकूल ,महिला सक्षमीकरण ,अल्पसंख्याक समाजाचा विकास अशा सर्व मुद्दाचा समावेश असलेला मोदी सरकारचा हा अर्थसंकल्प देशाला महासत्ता बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

 राज्यसभा खासदार,

श्री.धनंजय महाडिकसो.

Post a Comment

Previous Post Next Post