लाडकी बहिण योजनेचा प्रताप : इंगळी येथे एका महिलेने रेशनकार्डात नाव नसल्याने रागाच्या भरात हाताला खुरपे लावून घेतले.

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- हातकंगले तालुक्यातील इंगळी येथे रहात असलेल्या ज्योती सुभाष कांबळे (वय 28.रा इंगळी) यांनी सोमवार दि.15/07/2024 रोजी सकाळी 9 च्या सुमारास रहाते घरी डाव्या हाताच्या मनगटावर खुरपे लावून घेतल्याने प्रथम उपचार पट्टणकोडोली येथील शासकीय रुग्णालयात घेऊन पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात उपचार घेऊन घरी गेले.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

अधिक माहिती अशी की ,सध्या सर्वत्र मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी महिलांची धावपळ सुरू आहे.इंगळी येथील ह्या ही लाडकी बहिण योजनेचा फॉर्म भरायला गेल्या होत्या.पण रेशनकार्डात त्यांचे नाव नसल्याचे समजले .त्या कारणातुन पती पत्नीत वाद झाल्याने त्यांनी रागाच्या भरात डाव्या हाताच्या मनगटावर खुरपे लावून घेतल्याचे त्याच्या पतीने सांगितले.

-----------'-----------------------------

दुचाकी वरुन पडल्याने जखमी.

कोल्हापूर- पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील बापू रामचंद्र गायकवाड (वय 55) यांचा सोमवार दि.15/07/2024 रोजी  पाचच्या सुमारास काखे ओढ़या जवळ दु चाकी मोटारसायकल वरुन पडल्याने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले .या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

-------------------------------------

विषारी औषध घेतल्याने उपचारास दाखल.

कोल्हापूर- हातकणगले तालुक्यातील मौजे वडगांव येथील अमृता संदिप चौगुले (वय 27.) यांनी सोमवार दि.15/07/2024 रोजी सकाळी पाचच्या सुमारास  एसटी स्टँड परिसरात असलेल्या विक्रम हायस्कुल जवळ कोणत्यातरी कारणामुळे विषारी औषध सेवन केल्याने सीपीआर रुग्णालयात दाखल .या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

--------------------------------------

बेशुध्दावस्थेत एकाचा मृत्यु.

कोल्हापूर- सोमवार दि.15/07/2024 रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास मार्केट यार्ड परिसरात असलेल्या हायटेक कंपनी जवळ दत्तात्रय आनंदराव जौंदाळ (वय 53.रा.चव्हाण गल्ली ,रुईकर कॉलनी ) हे बेशुध्दावस्थेत आढ़ळल्याने त्यांच्या मित्राने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

--------------------------------------

Post a Comment

Previous Post Next Post