विषारी औषध घेतल्याने उपचारास दाखल.



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथे रहात असलेला       दिग्विजय तानाजी चौगुले (वय30)  याने शनिवार दि.07/07/2024 रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास शिंगणापूर येथील माळ नावाच्या शेतात विषारी औषध सेवन केल्याने त्याच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले .या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

---------------------------------------- 

अपघातात एक जण जखमी.

कोल्हापूर- राधानगरी तालुक्यातील राशीवडे ब्रु. येथील आण्णापा बाबू जोग (वय 76) याचा रविवार दि.07/07/2024 रोजी सकाळी 9 च्या सुमारास कोल्हापूर गारगोटी रोडवर इस्पुर्ली गावात एका देशी दारू दुकानाच्या समोर झालेल्या अपघातात जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी 108 अय्म्बुलन्स गाडीने (गाडी नं.MH-14-CL-460)सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

अधिक माहिती अशी की ,यातील जखमी इसम चालत जात असताना एका अल्पवयीन मुलाने  मोटारसायकल वरुन जात असताना धडक दिल्याने ते जखमी अवस्थेत रस्त्यातच खाली पडल्याने तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी जवळच असलेल्या अय्म्बुलन्स गाडीच्या ड्रायव्हरला माहिती दिल्याने जखमी अवस्थेत सीपीआर 

रुग्णालयात दाखल करण्यात आले.सदरची मोटारसायकल त्याच परिसरातील असून ती मोटारसायकल पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. 

----------------------------------------

   विषारी औषध घेतल्याने उपचारास दाखल.

कोल्हापूर- मंगळवार पेठेतील पाटाकडील तालीम परिसरात रहात असलेले अशोक यशवंत साळोखे (वय 47) यांनी रविवार दि.07/07/2024 रोजी सकाळी पावणे आठच्या सुमारास रहात्या घरात विषारी औषध सेवन केल्याने त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले .या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post