प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
गडहिंग्लज - सैन्यात असलेला जवान अमर भिंमगोंडा पाटील (रा.नुल) हा आपल्या गावा सुट्टीवर आला असताना त्याची पत्नी तेजस्वीनी अमर देसाई (रा.नुल सध्या पाटणे गडहिंग्लज) हिने आपल्या साथीदारांच्या मदतीने पतीचे डोळे आणि हात पाय बांधून जवानाच्या नाका तोंडावाटे विष पाजुन ठार मारण्याचा प्रयत्न केला.या प्रकरणी तिचा पती अमर याने पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी पत्नी आणि तिचा साथीदारावर गुन्हा दाखल करून पत्नी तेजस्विनी देसाई हिला अटक केली आहे.
अमर देसाई हे जम्मू काश्मीर येथे सेवा बजावत आहेत तर त्यांची पत्नी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पाटणे पाइप कारखान्या येथे बांधलेल्या घरात मुला मुली सोबत रहात आहेत.अमर देसाई सध्या सुट्टीवर आले आहेत.गुरुवारी (दि.18जुलै) रोजी रात्रीच्या सुमारास जेवण करून झोपले असतीना पत्नी तेजस्विनी ही आपल्या साथीदारांच्या मदतीने पती अमर याचे डोळे आणि हात पाय बांधून नाका तोंडावाटे त्यांना विष पाजुन ठार मारण्याचा प्रयत्न केला.पण त्या वेळी अमर अचानक जागे होऊन मोठ मोठ्याने ओरडून होते.त्या वेळी त्यांच्या आवाजाने आस पासच्या लोकांनी घराचा दरवाजा फोडून आत जाऊन तिच्या साथीदाराने मदती साठी आलेल्या एकाला मारहाण करून पळून गेला.या वेळी तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी अमर याला उपचारासाठी तेथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.अमर यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादी वरुन पत्नी तेजस्विनी आणि साथीदारावर गुन्हा दाखल केला .अधिक तपास सहा.पोलिस निरीक्षक निशानकर हे करीत आहेत.