दोषींवर त्वरित कारवाई करा, मुस्लिम बोर्डिंग तर्फे उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

विशाळगडावर काल झालेल्या प्रकाराने जिह्यातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. यातील समाजकंटकांचे नेतृत्व करणारे संभाजीराजे तसेच त्यांच्या स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी आणि दंगलीचे सूत्रधार असलेल्या पुण्याचे रवींद पडवळ यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी मुस्लिम बोर्डिंग कडून करण्यात आली आहे.

 या संदर्भात त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन दिले. तसेच दोषींवर तातडीने कारवाई झाली नाही तर धरणे आणि विराट मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. तसेच अतिक्रमणांविषयी जोपर्यंत कोर्टाचा निर्णय येत नाही, तो पर्यंत 'जैसे थे' परिस्थिती ठेवावी. त्याचप्रमाणे गजापूर, मुसलमानवाडी येथे पोलिसांनी सुरक्षा दिली नाही. फक्त बघ्याची भूमिका घेतली. यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांची बदली करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. यावेळी मुस्लिम बार्ंडगचे चेअरमन गणी आजरेकर, कादर मलबारी, जाफर मुजावर, कैश बागवान उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post