अपघातात महिला जखमी.

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

मुरगूड - येथील कमल दत्तात्रय भालकर यांचा बुधवार दि.17/07/2024 रोजी रात्री साडे आठच्या सुमारास आदमापुरातील बाळूमामा मंदीर परिसरात असलेल्या पेट्रोलपंपा जवळ झालेल्या अपघातात जखमी झाल्याने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले .या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

-------------------------------------

विषारी औषध घेतलेली महिला उपचारास दाखल.

कोल्हापूर-पन्हाळा तालुक्यातील पुनाळ येथे रहात असलेल्या शोभा शहाजी कांरडे (वय39) यांनी गुरुवार दि.18/07/2024 रोजी रहात्या घरात रात्रीच्या सुमारास "विडम्यार "नावाचे तननाशक सेवन केल्याने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले .या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

-------------------------------

मारहाणीत जखमी.

कोल्हापूर- कंळबा परिसरात साईमंदीर जवळ झालेल्या मारहाणीत शाहरुख सलीम मणेर (वय25.रा.केर्ली) हा जखमी झाल्याने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले .या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post