प्रेस मीडिया लाईव्ह
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर-करवीर तालुक्यातील वडणगे येथे रहात असलेला विक्रम संजय साखळकर (वय33) याचा सोमवार दि.08/07/2024 रोजी सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास साखळकर मळा असलेल्या शेतात लागवड टाकत असताना शेतात तुटुन पडलेल्या तारेला स्पर्श झाल्याने इलेक्ट्रीक शॉक लागून जखमी झाल्याने त्यांना बेशुध्दावस्थेत त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
यातील मयत विक्रम हा विवाहित असून तो शेतीचा व्यवसाय करीत होता.त्याच्या पश्च्यात पत्नी ,दोन मुली ,आई वडील आणि एक बहिण आहे.या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे
सीपीआर आवारात त्यांच्या नातेवाईकांसह मित्र परिवाराने मोठी गर्दी केली होती.महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटना स्थळी भेट देऊन सीपीआर मध्येही मयताच्या नातेकांची भेट घेऊन विचारपूस केली.
------------------------------------------------------------------
आणि मुलांच्या मृत्युने धक्का बसलेल्या मातेचा मृत्यु.
मलकापूर - कोपार्डे येथे शॉक लागून दोन्ही मुलांचा मृत्यु झाल्याने मुलांच्या विरहाने मातेचा ही मृत्यु झाला.नंदाताई कृष्णा पाटील (वय 56) यांचा शनिवारी रात्रीच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची माहिती ग्रामस्थांना समजताच गावावर शोककळा पसरली .या कोपार्डे गावात 3 जुलै रोजी सुहास आणि स्वप्निल या भावंडाचा शेतात फवारणी करत असताना तेथील विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने दोघांचा जागीच मृत्यु झाला होता.दोन्ही कर्ती सवर्ती मुलांचा मृत्युच्या धक्याने त्या खचून गेल्या होत्या.घरी येत असलेले पै पाहुणे आणि ग्रामस्थांना त्यांची अवस्था केवीलवाणी झाल्याने त्यांच्यात हळहळ व्यक्त केली जात होती.त्यातच शनिवारी रात्री नंदाताई पाटील यांचा मृत्यु झाला.