व्ही.एस.एंटरप्राईजेवर कारवाईची मागणी: विश्वजीत जाधव यांने पोलीस अधिक्षकांना निवेदन दिले
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : सीपीआर रुग्णालयास सर्जिकल साहित्य पुरवठा करण्याच्या ठेगा आपणास मिळावा यासाठी व्ही.एस.एंटरप्राईजेस कंपनीचे मयुर लिंबेकर यांनी बनावट कागदपत्रे तयार करून पाच कोटी रुपयांचे साहित्य रुग्णालयास पूरवठा केले. अशा प्रकारे फसवणूक केल्याबदद्दल त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी विश्वजीत जाधव,गौरव पाटील यांनी पोलीस अधीक्षक यांना बुधवारी दिलेल्या निवेदनातून केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे, सीपीआर रुग्णालयास साहित्य पुरवठा केलेली फर्म व्ही. एस. एंटरप्रायजेसचे मयूर लिंबेकर यांनी सर्जिकल साहित्य पुरवठा करण्याचा ठेका स्वताला मिळावा म्हणून मुलूंड येथील रुग्णालयाचे बनावट लेटरपॅड तयार केले व त्या लेटर पॅडवर औषधाच्या सर्जिकल साहित्याच्या वस्तूच्या आपल्या आर्थिक गैरलाभासाठी व शासनाची गैरहानी करण्याच्या उदद्देशाने मनाप्रमाणे किंमती दाखवून या लेटर पॅडवरील पत्रव्यवहारानुसार दिल्लीतील कंपनीकडून खरेदी केल्याचे दाखवले. पाच कोटी रुपयांची औषधांचा ठेका घेतला.
याबाबत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात २२ जुलै रोजी तक्रार अर्ज केला होता. मात्र यावर काहीच निर्णय झाला नाही. त्यामुळे बोगस दरपत्रकानुसार सीपीआर प्रशासनाला पाच कोटी रुपयांची औषधे विक्री करून फसवणूक करणाऱ्या मयुर लिंबेकर याच्या कंपनीसह सीपीआरच्या दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून केली आहे.
------------------------------------------------
अपघातात जखमी.
कोल्हापूर - टोप येथे रहात असलेले शंकर शामराव कांरडे (वय 35) यांचा बुधवार दि.31/07/2024 रोजी दुपारी साडे चारच्या सुमारास तावडे हॉटेल ब्रिजवर झालेल्या अपघातात जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.