A young man died on the spot due to an electric wire falling on him.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- हातकंगले तालुक्यातील नागाव येथे रहात असलेले सुनिल बापू शिंदे (वय 44.रा नागाव) या चा शनिवार दि.06/07/2024 रोजी सकाळी 8 च्या सुमारास उसाच्या शेतात औषध फवारणी करीत असताना उच्च दाबाची विजेची तार त्यांच्या अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला.त्याचा अशा प्रकारे मृत्यु झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
अधिक माहिती अशी की , यातील मयत सुनिल हा शिरोली एमआयडीसी येथे नोकरीस होता.काल रात्री काम करून घरी येऊन सकाळी आपल्या शेतात औषध फवारणीसाठी घरातील पंप घेऊन शेतात गेला होता औषध फवारणी करीत असताना त्यांच्या शेतातुन गेलेली उच्च दाबाची विद्युत तार तुटुन अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला या वेळी तेथे आस पास असलेल्या शेतकऱ्यांनी आरडाओरडा केला.
या घटनेची माहिती गावात समजताच त्यांच्या नातेवाईकांनी घटना स्थळी धाव घेतली.या घटनेची माहिती शिरोली एमआयडीसी पोलिसांना समजताच पोलिस घटना स्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात पाठविण्यात आला.त्यांच्या पश्यात पत्नी ,मुलगा आणि आई असा परिवार आहे.