प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- उत्तरप्रदेश राज्यातील भुडनगरिया येथे रहात असलेला राहुलसिंग हरविरसिंग जाडौन हा सोमवार दि.15/07/2024 रोजी लक्ष्मीपुरी पोलिसांना संशयास्पद फिरताना आढळल्याने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता दि.11/04/2024 रोजी घरातुन निघून गेल्याचे समजले पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्याच्या नातेवाईकांच्याकडे चौकशी केली असता तीन चार महिन्यापूर्वी घरातुन निघून गेल्याचे सांगितले.तेव्हा सदरचा तरुण कोल्हापुरात असल्याचे सांगून तो लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात असल्याची माहिती दिली.त्याचे वडील आल्याने त्यांची माहिती घेऊन त्याला त्याचे वडील हरविंदरसिंग चिरंजीसिंग जाडौन यांच्या ताब्यात देण्यात आले.
ही शोध मोहिम लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉ.किशोर पवार ,मंगेश माने आणि तानाजी दावणे यांनी केली.