सख्या भावासह चौघांना 7 दिवसांची पोलीस कोठडी.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर -कनाननगर येथे रहात असलेला पंकज निवास भोसले याचा राजारामपुरी परिसरात मंगळवार दि.02/07/2024 रोजी दुपारी तीनच्या सुमारास खून झाला होता.राजारामपुरी पोलिसांनी गणेश काटे आणि निलेश काटे या दोघांना अटक केली होती.यातील फरार असलेल्या आणखी दोघांना अटक करून अशा चौघां संशयीत आरोपीना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्या चौघांना 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.यात गणेश विक्रम काटे (वय 30) निलेश विक्रम काटे (वय 27) उमेश विक्रम काटे (वय32.तिघे रा.कनाननगर) या तिघा सख्या भावासह त्यांचा साथीदार उमेश उल्हास गायकवाड (वय 30.रा.कनाननगर) यांचा अटक केलेल्यात समावेश आहे.
यातील मयत पंकज आणि काटे भाऊ एकाच ठिकाणी रहात असून एकमेकांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल आहेत.त्या मागे घेण्याच्या कारणातुन पंकज याचा पाठलाग करत काठी आणि दगडाचा वापर करून खून करण्यात आला होता.खूनानंतर घटना स्थळावरुन काल दोघांना अटक केली होती.तर अन्य दोघांना आज अटक करून त्यांना न्यायालयात हजर करून न्यायालयाने 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.