वैद्यकीय तपासणी साठी आणलेल्या आरोपीचा पळुन जाण्याचा प्रयत्न.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - सीपीआर रुग्णालयात विनयभंग मधील आरोपीला वैद्यकीय तपासणी करून थांबलेल्या आरोपीने पोलिसांची नजर चुकवून पळून जाण्याचा प्रयत्न केला.या मुळे पोलिसांची चांगलीच पाचावर धारण बसली.ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली असून त्या आरोपीला पोलिसांनी पाठलाग करून पकडल्याने पोलिसांचे संकट टळले .

अधिक माहिती अशी की ,विनयभंग प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी सीपीआर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी साठी आणले होते.तपासणी करून झाल्यानंतर चहा पिण्याचे कारण सांगून चहा पिण्याचे निमित्त करून पोलिसांना हिसडा मारुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला.अचानक झालेल्या घटनेने पोलिस घाबरून त्यांची चांगलीच तारांबळ उडाली.त्यांनी लागलीच सीपीआरच्या सिक्युरीटी गार्डना सांगून प्रवेश द्वार बंद करण्यास सांगून पळुन जात असलेल्या आरोपीला पोलिसांनी आणि सुरक्षारक्षकांनी पकडले.या प्रकाराने सीपीआर आवारात बघ्याची मोठी गर्दी जमली होती.

Post a Comment

Previous Post Next Post