स्थानिक गुन्हे अन्वेषन पथकाची कारवाई.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- मोबाईल टॉवरच्या साहित्याची चोरी केल्या प्रकरणी बाळासाहेब कांबळे,बळीराम उपाडे, ( दोघे रा.लातुर)प्रशांत दिलीप जोगदंड(रा.बीड) आणि शिवाजी राजू वासुदेव या चौघांना अटक करून त्यांच्या कडील 70 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करून त्यांना पुढ़ील तपासासाठी गगनबावडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
अधिक माहिती अशी की,गगनबावडा येथे असलेल्या जरगी येथे बाळासाहेब कांबळे आणि बळीराम उपाडे यांनी मोबाईल टॉवरच्या साहित्याची चोरी करून तो चोरी केलेल्या मालाची विक्री करुन लातुर जाण्यासाठी कोल्हापुर येथे एसटी स्टँडवर थांबल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला मिळाली होती.या पथकातील पोलिसांनी एसटी स्टँडवर येऊन त्या दोघांचा शोध घेतला असता ते सापडले नसल्याने कोल्हापुर परिसरात शोध घेतला असता ते परिख पुलाच्या टाकाळाकडे जाणारयां मार्गावर उभा असलेले दिसले त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता प्रथम उडवा उडवी केली.पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी मोबाईल टॉवरच्या साहित्याची चोरी केल्याची कबुली दिली.चोरीतील साहित्य कोठे आहे असे विचारताच आमचा साथीदार प्रशांत जोगदंड याने राधानगरी येथे कुणाला तरी विकून येथे येणार असल्याने आम्ही त्याची वाट बघत थांबलो होतो.अशी माहिती दिल्याने या पथकातील पोलिसांनी राधानगरी येथे जाऊन प्रशांत जोगदंड आणि शिवाजी वासुदेव यांना ताब्यात घेऊन अटक करून त्यांच्याकडील 70 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषनचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,उपनिरीक्षक शेष मोरे ,संदिप जाधव यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.