प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- पन्हाळा तालुक्यातील यवलूज येथे रहात असलेल्या वत्सला बाळू जाधव (वय 65) यांचा शुक्रवार दि.12/07/2024 रोजी सकाळी नऊच्या सुमारास तुकाराम धनगर यांच्या घरासमोर एका दुचाकीवाल्याने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी बेशुध्दावस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
अधिक माहिती अशी की ,यातील मयत वत्सला शेळके या सकाळी नऊच्या सुमारास दुसरयांच्या शेतात भागलणी साठी पायी चालत जात होत्या.त्या वेळी तेथुन जात असलेल्या दुचाकी चालकांने भरधाव वेगात येऊन या महिलेला जोराची धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.सदरचा दुचाकी चालक हा व्हन्नुर (ता.कागल ) या गावचा असून तो काही दिवसांपासून यवलूज येथे त्याच्या नातेवाईकांच्याकडे रहाण्यास आला होता अशी माहिती मयताच्या नातेवाईकांनी दिली.त्यांच्या पश्च्यात पती,एक मुलगा आणि दोन मुली आहेत.
---------------------------------------------------------------------
विषारी औषध सेवन केल्याने एक जण रुग्णालयात.
कोल्हापूर-पाचगाव परिसरातील शांतीनगर येथे रहात असलेला प्रकाश बंडू माने (वय 60) याने शुक्रवार दि.12/07/2024 रोजी दुपारी दोनच्या सुमारास रहात्या घरात मॉर्टीन लिक्वीड सेवन केल्याने त्याला त्याच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले .या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
--------------------------------------------------------------------
इलेक्ट्रिक शॉक लागून तरुण जखमी
कोल्हापूर- कागल येथे असलेल्या कागल एमआयडीसी परिसरात असलेल्या आर्या स्टिल कंपनीत काम करीत असताना शुक्रवार दि.12/07/2024 रोजी सकाळी साडे सहाच्या सुमारास इलेक्ट्रीक शॉक लागून जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले .या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.