प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर-करवीर तालुक्यातील कोगे येथे रहात असलेला ऋत्विक जोतिराम पाटील (वय 24) याने गुरुवार दि.11/07/2024 रोजी सकाळी आठच्या सुमारास रहात्या घरात विषारी औषध सेवन होते.त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथे उपचार चालू असताना शनिवार दि.20/07/2024 मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपी आर पोलिस चौकीत झाली आहे.
दरम्यान ऋत्विक याच्या मृत्युला खाजगी सावकार जबाबदार असल्याची फिर्याद ऋर्षीकेश जोतिराम पाटील यांनी करवीर पोलिस ठाण्यात दिली.या प्रकरणी करवीर पोलिसांनी वैभव शिवाजी फडतारे ,ऋर्षीकेश कृष्णात हारुगले आणि राहुल उर्फ रावजी अरुण मोरे (तिघे रा.कोगे ,ता.करवीर) या तिघांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी की,यातील मयत हा खाजगी नोकरी करत होता.त्याने कर्जाने मोटारसायकल घेतली होती.त्याचे हप्ते थकल्याने ऋत्विक यांने कोगे येथील वरील तिघां सावकराकडुन वेळो वेळी कर्जाऊ रक्कम घेतली होती.ती रक्कम वेळेत सावकरांना न दिल्याने ऋत्विकला धमकी देत डब्बल पैशाची मागणी करत शिवीगाळ केली.यातील आरोपी राहूल मोरे यांने त्याच्या मोबाईलवर धमकीचे व्हाइस मेसेज पाठविल्याने या त्रासाला कंटाळून विषारी औषध घेऊन त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे ऋर्षीकेश पाटील याने पोलिसांना सांगितले.याचा तपास करवीर पोलिस ठाण्याचे पोसई भोसले करीत आहेत.