प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर -वाहन चोरी प्रकरणातील रेकॉर्ड वरील गुन्हेगांरासह पाच जणांना अटक करून त्यांच्या कडील दोन लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करून या प्रकरणी संतोष सचिन लाड (वय 24.रा.अहिल्याबाई होळकरनगर ,फुलेवाडी रिंगरोड) दर्शन रमेश जाधव (वय 22.रा.शिवतेज तरुण मंडळ दत्त गल्ली).आशितोष अमर कांरडे (महादेवनगर फुलेवाडी) प्रतिक विलास पाटील आणि साहिल मुल्ला (वय 26.रा.बीडी.कामगाळ चाळ राजोपाध्येनगर) यांना स्थानिक गुन्हे अन्वेषनच्या पथकाने अटक करून पुढ़ील तपासासाठी मुद्देमालासह कोडोली आणि करवीर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
अधिक माहिती अशी की,कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्याचे वाढ़ते प्रमाण ही चिंताजनक बाब असून त्याचा तपास करुन शोध घेण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषनच्या पथकाला दिल्या होत्या.या पथकातील पोलिसांनी तपास करीत असताना संतोष लाड आणि दर्शन जाधव यांनी वाडी रत्नागिरी येथे वाहन चोरल्याची माहिती मिळाली पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपल्या दोघां साथीदारांच्या मदतीने वाहन चोरीची कबुली देऊन चोरलेली आल्टो गाडी नं.MH-02-BT4717 ही कार जप्त केली .त्याच प्रमाणे त्याचे साथीदार आशितोष कांरडे व प्रतिक पाटील यांनाही ताब्यात घेऊन एकत्रितपणे चौकशी केली असता पंधरा दिवसांपूर्वी भोगावती येथे एक आल्टो कार चोरुन ती साहिल मुल्ला याला विकल्याची माहिती दिली असता पोलिसांनी साहिल मुल्ला यालाही ताब्यात घेऊन गाडी नं.MH-08-C-6571 या गाडीचे सुटे केलेले पार्टसह यांना ताब्यात घेऊन त्यांना मुद्देमालासह कोडोली आणि करवीर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.वरील आरोपीकडुन एक आल्टो गाडी ,व एका गाडीचे सुटे केलेले पार्ट आणि गुन्ह्यात वापरलेली मोपेड असा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.वरील आरोपीना कोडोली आणि करवीर पोलिस ठाण्यात हजर केले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषनचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,पोलिस उपनिरीक्षक संदिप जाधव पोलिस हिंदुराव केसरे ,दिपक घोरपडे,सोमराज पाटील,रोहित मर्दाने,संजय पडवळ,हंबीरराव अतिग्रे आणि अमित मर्दाने यांनी केली.