खा.महाडिक यांची गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे मागणी.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- विशाळगड येथे 14 जुलै रोजी अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने या बद्दल अनेकांच्या कडुन आरोप प्रत्यारोप होत असून या आंदोलनात सामील असलेल्या कार्यकर्त्यांवर पोलिस प्रशासनाने शिवभक्तावर गुन्हे दाखल केले आहेत. तरुणांच्या भविष्याचा विचार करून आणि सामाजिक शांतता राखण्यासाठी राज्य शासनाने शिवभक्ता वरील दाखल केलेले त्वरीत मागे घेण्याची मागणी खा.धनंजय महाडिक यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करुन त्या बाबतचे निवेदन सादर केले.या मागणीला गृहमंत्री फडणवीस यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला.या घटनेची माहिती घेऊन कोणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचे सांगितले.
या मुळे विशाळगड येथे अतिक्रमण हटाव आंदोलनात सहभागी असलेल्यांना दिलासा मिळाला आहे.