प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर -वटपोर्णिमेच्या निमीत्त जिद्द फौंडेशनच्या वतीने एक आगळा वेगळा उपक्रम घेऊन "शृंगार माझा अधिकार " या नावाने अशा व्यक्ती करिता घेऊन येत आहेत की समाजात त्यांना इतर महिलांच्या बरोबरीने त्यांना मानसन्मान मिळाला पाहिजे या विचाराने ज्या महिलांच्या पतीचे निधन झाले.
त्या महिलांना इतर कार्यक्रमात सहभागी होता येत नाही अशा माझ्या माता भगिनीसाठी हळदी कुंकूचा जो तिचा अधिकार आहे मानसन्मान आहे तो समाजाने आणि त्यांच्या नातेवाईकांनी हिरावून घेतला आहे तो त्यांना मिळावा हा जिद्द फौंडेशनच्या संस्थापिका सौ.गिताजंली डोंबे यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे.ज्या महिलांच्या पतीचे निधन झाले त्यात त्यांचा काही दोष नसतो.त्यांच्या पतीच्या निधनाने पती गेल्याचे दु:ख एवढे मोठे असते त्या पेक्षा मोठे दु:ख समाजाने आणि नातेवाईकांनी दिलेले दु:ख दिलेल्या वागणुकीमुळे होत असते.अशा महिलांना गरज असते ती मायेची त्यांना समजून घेण्याची अशा महिलां ज्या जगताना संघर्ष करून वाईट अनुभवाला तोंड देत जगत असतात त्यांना माझा सलाम .या संघर्षातुन बाहेर पडण्यासाठी त्यांना एक आधार म्हणून जिद्द फौंडेशन हा आगळा वेगळा उपक्रम राबविण्याचे धाडस करीत आहे.जी वागणूक सुहासिन स्त्रियांना मिळत आहे तीच वागणूक विधवा स्त्रियांना मिळावी .तर या उपक्रमाला सर्वानी मिळुन या प्रथा बंद करून या स्त्रियांना समाजात सन्मानाने मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देऊ या.या अशा स्त्रियांना प्रोत्साहान देण्यासाठी आपण आपल्या कुंटुबिया समवेत मोठ्या संख्येने उपलब्ध असणे आवश्यक आहे.
हा कार्यक्रम शनिवार दि.06/07/2024 रोजी दु.साडे चार वाजता चिले हॉल ,रायगड कॉलनी पाचगाव रोड येथे होणार असून प्रमुख उपस्थिती स्वामी शांती प्रकाश ट्रस्टचे (उल्हासनगर) रमेश तनवाणी ,उद्योजक विजय शिंदेसो ,(मा.सदस्य .पाचगाव) प्रसिद्ध अभिनेते मदन पंलगे ,सरपंच प्रियांका पाटील,मा.महापौर अश्विनी रामाणे ,नविता नाईक ,तेजस्विनी काशीद,आशाराणी थडके ,वर्षा जोशी आणि जिद्द फौंडेशनच्या संस्थापिका गिताजंली डोंबे याची उपस्थिती राहणार आहे.