अंतर्गत वादातुन तरुणाचा दगडाने ठेचून खून , दोघे जण ताब्यात.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर -राजारामपुरी परिसरात असलेल्या दिपा ग्यस येथे मंगळवार दि.02/07/2024 रोजी दुपारी तीनच्या सुमारास पंकज निवास भोसले (वय 33.रा.फर्नाडिस किराणा स्टोअर्स जवळ,कनाननगर ) याचा तिघा संशयीत हल्लेखोरांनी डोक्यात काठी मारुन आणि दगडाने ठेचून भीषण खून केल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी पोलिसांनी गणेश काटे आणि निलेश काटे (दोघे रा.कनाननगर) यांना राजारामपुरी पोलिसांनी पकडून अटक केली.

पंकज हा वाहन चालक म्हणून काम करीत होता .तो राजारामपुरीतील मनिष बसर्गे यांच्याकडे चालक म्हणून काम करीत होता.आणि तेथेच त्यांच्या बंगल्याच्या  मागच्या बाजूला असलेल्या खोलीत रहात होता. त्याचे नातेवाईक कनाननगरात रहात आहेत.त्याच्या मोठ्या बहिणीचे लग्ण झाले आहे.पंकज यांचे काटे बंधुशी भांडण झाले होते.गेल्या काही वर्षापासून त्यांच्यात वाद सुरु होता.या रोजच्या कटकटीला कंटाळून पंकज कामाच्या ठिकाणी रहात होता.मंगळवारी दुपारी पंकज आपल्या खोलीत विश्रांती घेत असताना गणेश ,निलेश आणि त्यांचा एक साथीदार असे तिघे जण मोटारसायकल वरुन बसर्गे यांच्या दुकाना जवळ येऊन पंकजला बाहेर बोलवून घेऊन त्याच्याशी वाद घालत आणि शाब्दीक चकमक झाली.हा वाद मालकांच्या बंगल्या समोर चालू असल्याने पंकज पुढ़े चौकात आल्यावर हल्लेखोरांनी अचानक पंकजच्या डोक्यात काठी मारुन खाली पाडले आणि तेथेच रस्त्यात पडलेला दगड उचलून त्याच्या डोक्यात घालून त्याचा चेंदामेंदा केला .पंकज रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून हल्लेखोर पळुण जाण्याच्या तयारीत होते.याची माहिती राजारामपुरी पोलिसांना समजताच पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे हे तात्काळ घटना स्थळी जाऊन  त्यानी हल्लेखोर दोघां काटे भावांना अटक केली.

पोलिसांनी रुग्णवाहिका बोलवून जखमी पंकजला सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे त्याचा उपचार चालू असताना तयार मृत्यु झाला.पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा करून रक्ताने लागलेले दगड ,मयताचे घड्याळ ,मयताचे कपडे ,बूट ताब्यात घेऊन तिघां  संशयीत हल्लेखोरावर राजारामपुरी पोलिस ठाण्यात रात्री उशिराप्रर्यत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते .

Post a Comment

Previous Post Next Post