करनूर येथे दोन ठिकाणी धाडसी चोरी.



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर-कागल तालुक्यातील करनूर येथे चोरट्यांनी दोन ठिकाणी बंद असलेलया घरात चोरी करून पोबार केला.कागल पोलिसांनी घटना स्थळी भेट देऊन माहिती घेतली.दरम्यान ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे सीसीटिव्ही बसवण्याची मागणी केली.

करनूर येथे रहात असलेले सुनिल शिवराम घाटगे यांच्या बंद घराचा दरवाजाचे कुलुप तोडुन आणि कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी घरात प्रवेश करून तिजोरीतील सर्व साहित्य विस्कटून टाकून पितळेच्या भांड्यांचे गोठोडे चोरुन नेण्याचा प्रयत्न केला.तसेच उदय बाळकू पाटील हे परगावी गेल्याने त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन तिजोरी फोडून त्यातील साहित्य विस्कटून अन्न धान्याची नासधूस केली.उदय पाटील हे परगावी असल्याने घरातील नेमके काय काय चोरीला गेले हे अद्याप समजले नाही.पंरतु घटना स्थळी सोन्या चांदीचे किमंती दागीने चोरीस गेल्याची चर्चा आहे.

कागल पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटना स्थळी येऊन पंचनामा करून चोरीची माहिती घेतली.मात्र चोरीस गेलेल्या मालाची माहिती घेतली नसल्याचे समजते.गेल्या आठवड्यापूर्वीच एका वृध्दाचा कोयता हल्ला करून खून झाल्याची घटना ताजी असतानाच दोन ठिकाणी चोरीची घटना घडल्याने गावात भितीचे वातावरण पसरले आहे.आणि ग्रामस्थांनी गावात सीसीटिव्ही बसवण्याची मागणी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post