50 लाखांचे सोने घेऊन पसार झालेल्या परप्रांतिय कारागीर ताब्यात ,15 तारखेप्रर्यत पोलिस कोठडी.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- सहा महिन्या पासून 50 लाखां पेक्षा जास्त किमंतीचे सोने घेऊन पसार झालेला काशीनाथ बिधान पत्रा (वय 40.रा.कासार गल्ली ,गुजरी .मुळ रा.प.बंगाल ,) याला जुना राजवाडा पोलिसांनी सापळा रचून त्याला बुधवारी अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 15 तारखे प्रर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.

अधिक माहिती अशी की,अटक केलेला परप्रांतीय कारागीर हा गुजरी परिसरात असलेल्या अपार्टमेंट मध्ये आपल्या साथीदारांसह रहात होता.येथील सराफांना चोख सोन्याचे दागिने तयार करून देत होता.कोल्हापुरात असलेल्या मोठ्या सराफांच्या सोने घेऊन त्यांच्या ऑर्डर प्रमाणे सोन्याचे दागिने बनवून देत होता.या कारागिराकडे पाच -सहा कारागिर कामाला होते.काशिनाथ याने व्यवसायात मंदी आल्याने  सराफ व्यावसायिकांच्या कडुन दागिने बनवून देण्यासाठी आलेले 844  gm. चोख सोने याची किमंत 50 लाखां  पेक्षा जास्त किमंतीचे सोने  14 फेब्रुवारी 2024 काशिनाथ आणि त्याचे साथीदार सोमन पत्रा ,मेव्हणा बिटू शुभकंर माइती शंतनु आणि सपन प्रामाणिक हे  कोल्हापूर शहरातुन पळून गेले होते.या प्रकरणी त्यांच्यावर 15 फेब्रुवारी 2024 रोजी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिसांनी प.बंगाल मध्ये लपलेल्या काशिनाथ यांचा शोध जुना राजवाडा पोलिसांनी काशिनाथ याचा शोध घेऊन अटक केली.पोलिस इतर साथीदारांचा शोध घेत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post