प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - मुंबईतील सराफ कोल्हापुरातील काही सराफाना दागिने दाखविण्यासाठी कोल्हापुरात आला होता.परत पुण्याला जाण्यासाठी रविवार दि.30/06/2024 रोजी सायंकाळी सात सुमारास मध्यवर्ती एसटी स्टँडवर आला असता पुण्याला जात असलेल्या एसटीत बसला असता एक कोटी रुपये किमंतीचा सोन्याच्या दागिन्यांची बँग गायब झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शोधाशोध केली पण चोरटा मिळाला नाही शेवटी सराफ कमीशन एंजट सुजितसिंग सुखदेवसिंग चौहान (वय 48.रा.वडाळा,मुंबई) यांनी शाहुपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. शाहुपुरी पोलिस यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक चोरट्यांचा शोध घेत आहेत.
अधिक माहिती अशी की ,मुंबईहून आलेले सराफ हे कमीशन एंजट असून ते काही सराफ व्यावसायिकांना होलसेल दागिने पुरवित असत ते रविवारी कोल्हापुरातील काही सराफ व्यावसायिकांना दागिने दाखवून परत पुण्याला एसटीने जात असताना सोन्याच्या दागिन्यांची असलेली बॅग सिट वरील रॅक मध्ये ठेवला असता हा प्रकार घडला.या कमीशन एंजट असलेला चौहान यांच्या कडे मुंबईतील आणि पुण्यातील सराफांचे हे दागिने असल्याचे समजते.