प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- मोबाईलची परस्पर विक्री करुन 14 जणांची 19 लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी गणेश जाधव (रा.नंदनवन पार्क ,कोल्हापूर ) आणि अनिकेत चिपरे (रा.रायगड कॉलनी,पाचगाव) यांच्यावर शुक्रवार दि.11/07/2024 रोजी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून याची फिर्याद उमेश आनंदराव भोसले (वय 40.रा.कोडोली ता.पन्हाळा) यांनी दिली असून लक्ष्मीपुरी पोलिसांनी अनिकेत चिपरे याला अटक केली आहे.
अधिक माहिती अशी की ,यातील आरोपी यांनी गणेश जाधव आणि अनिकेत चिपरे यांनी संगनमत करुन फिर्यादी उमेश भोसले यांच्यासह सुप्रिया भोसले,संतोष संभाजी दाभाडे (रा.आरळे,ता.पन्हाळा)सुभाष बानो बनपट्टे (रा.कोडोली) दिपक चंदर गोसावी (रा.कोडोली) कृष्णात मारुती महापुरे (रा.आरळे)गणपतराव सर्जेराव माने (आरळे) जगन्नाथ कृष्णा वडर (रा.कोडोली) सुलभा मोरे (कोडोली) सुरज सनदे (रा.पाखले) जीवन रघुनाथ कांंबळे (सैदापूर) महादेव पाटील (रा.पारगांव)अक्षय गायकवाड (रा.पाडळी)प्रशिक कुमार कांबळे आणि अमर चव्हाण (दोघे रा.इंचलकरंजी) यांचा विश्वास संपादन करून तुम्हाला लोन मिळवून देतो असे सांगून मिळालेल्या लोन मधील 25% रक्क्म कट करून उरलेली रक्कम परत देतो आणि त्याचे कर्ज हपत्याने फेड करण्याचे सांगून फिर्यादीसह 14 जणांच्या नावे कर्ज उचलून बजाज फायनान्स कंपनी आणि एचडीएफसी बँकेत मोबाईल वर 15 लाख तीन हजार नऊशे रुपये लोन काढून मोबाईल फोन दुसरया व्यक्तीला परस्पर विकून ती रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी
घेऊन यातील फिर्यादीसह 14 जणांची फसवणूक केल्या प्रकरणी फसवणूकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.हा प्रकार हिरापन्ना मोबाईल शॉपी लक्ष्मीपुरी आणि राजारामपुरी येथे 26/02/2024 ते 18/03/2024 या कालावधीत घडला आहे.