शेतात वैरणीसाठी गेलेल्यांचा ओढ़यात पाय घसरून पडल्याने मृत्यु

 

प्रेस मीडिया लाईव्ह

मुरलीधर कांबळे

कोल्हापूर - पन्हाळा तालुक्यातील गोलीवडे येथील शेतकरी सरदार नामदेव पाटील (वय 40 ) हे शुक्रवार दि.26/07/2024 सकाळी सातच्या सुमारास शेतात वैरण आणण्यासाठी ओढ़यातुन जात असताना ते पाण्यात पाय घसरून पडल्याने त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यु झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली नव्हती.अधिक माहिती अशी की ,यातील मयत हे सकाळी सातच्या सुमारास वैरणीसाठी जात होते.जाण्याचा मार्ग ओढ़यातुन असल्याने पाण्यातुन  जात असताना पाय घसरून पडले पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यांना पाण्याबाहेर येता आले नसल्याने तेथेच पडल्याचे त्यांच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आले असता त्यांना तात्काळ पाण्याबाहेर काढ़ुन त्यांना उपचारासाठी  नातेवाईकांनी बेशुध्दावस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात नेत असताना वाटेत त्यांचा मृत्यु झाला.त्यांच्या पश्च्यात पत्नी एक मुलगा आणि दोन लहान मुली आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post