दुचाकी मोटारसायकल वरुन पडल्याने महिलेचा मृत्यु.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - शिरोळ तालुक्यातील टाकवडे येथे रहात असलेल्या रुक्मिणी पांडुरंग कांबळे (वय 52) ह्या मंगळवार दि.09/07/2024 रोजी सकाळच्या सुमारास मुलाच्या दुचाकी मोटारसायकल वरुन जात होत्या.त्या मागे सरकत असताना  खाली पडल्याने जखमी झाल्या होत्या.त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारापूर्वी अडीचच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

अधिक माहिती अशी की  ,यातील मयत ह्या आपला मुलगा गंगाधर कांबळे यांच्या दुचाकी मोटारसायकल वरुन कं.बावडा येथे त्यांचे नातेवाईकाचे निधन झाल्याने त्या कार्यासाठी जात असताना माणगांव फाटा जवळ दुचाकी मोटारसायकलवर मागे सरकत असताना त्या खाली पडल्याने त्यांना जखमी अवस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल केले.यात त्यांचा मुलगा गंगाधर याला दुखापत झाली नाही.अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.त्यांच्या पश्च्यात पती,एक मुलगा आणि दोन विवाहित मुली आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post