रिक्षा चालकांचा विलंब दंड माफ .

  साखर पेढ़े वाटुन आनंदोत्सव साजरा.

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने रिक्षा ट्यक्षी वाहन पासिंगसाठी 50 रुपये विलंब दंड आकारला जात होता.या साठी रिक्षा चालकांनी आंदोलन करून शासनाला निवेदन पाठविण्यात आले होते.त्या नुसार सरकारने दंड रद्द केल्याने गुरुवारी मध्यवर्ती एसटी स्टँड परिसरात रिक्षा चालकांनी साखर पेढ़े वाटुन गुलालाची उधळण करत फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला.यावेळी चंद्रकांत भोसले ,कॉ.रघुनाथ कांबळे,आपचे संदिप देसाई,अविनाश दिंडे ,राहुल पोवार आणि दिंगबर चव्हाण हजर होते.सर्वच प्रकारच्या वाहनांना दररोज 50 रुपये विलंब आकारला जात होता.या विरोधात कोल्हापूर शहरातील वाहनधारकांच्या संघटनानी आंदोलने केली करुन प्रादेशिक परिवहन कार्यालयावर मोर्चा,निवेदने आणि शासनाच्या परिपत्रकाची होळी  व रिक्षा बंद अशा प्रकारची आंदोलने केल्याने याची शासनाने दखल घेऊन विलंब आकार रद्द करण्याचा एऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,अजित पवार सरकारने घेतला.

----------------------------------------

पोस्ट ऑफिसमध्ये चोरीचा प्रयत्न.

कोल्हापूर- चोरीच्या उद्देश्याने मार्केट यार्ड परिसरात असलेल्या पोस्ट ऑफिसचा लाकडी दरवाजा तोडून बुधवारी रात्री चोरट्यांने प्रवेश करून त्याने लोखंडी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला पण हाती काहीच लागले नाही.पोस्ट कार्यालयाचे नुकसान केल्या बद्दल सबपोस्ट मास्तर अशोक राजाराम चव्हाण (वय 58 .रा.उचगाव ) यांनी शाहुपुरी पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली.पुढ़ील तपास पोलिस करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post