कोल्हापूर पावसाचा हाहाकार ,पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ़..

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- आज कोल्हापुर शहरासह कोल्हापूर जिल्ह्यातही सकाळ पासून पावसाने जोर धरल्याने पुराच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.पंचगंगा नदीचे पाणी 37 फुटा प्रर्यत आल्याने कोल्हापूरात धाकधूक वाढ़ली आहे.वरुन पावसाचा जोर आणि धरणातुन सोडलेले पाणी या नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुर येत असलेल्या भागातील नागरिकांनी स्थलांतरांची तयारी सुरू चालू आहे.

आज रविवार पासून कोल्हापूर जिल्ह्यात सतत धार चालू असून पन्हाळा,शाहुवाडी ,राधानगरीसह गगनबावडा येथे जोरात एक सारखा पाऊस पडत आहे.धरण क्षेत्रातही पावसाने जोर धरला आहे.कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी तळ्याचे स्वरुप धारण झाले आहे.पुराच्या पाण्यामुळे शहरात जनजीवन विस्कळीत झाले असून  आज रविवार आठवडा बाजार असल्याने नागरिकासह लहान मोठ्या व्यावसायिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

 आज रविवार आठवडा सुट्टी असून  नागरिक पावसाच्या सतत पडत असलेल्या सरीने घरीच रहाणे पसंत केले  काम असेल तरच घराबाहेर पडत आहेत .

Post a Comment

Previous Post Next Post