विशाळगड येथे झालेल्या तोडफोड प्रकरणी पाचशे जणांच्यावर गुन्हा दाखल 21जणांना अटक.

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- रविवार दि.14 जुलै रोजी विशाळगड येथे विविध ठिकाणाहून कार्यकर्ते मोठ्या संख्येने विशाळगडला रवाना झाले होते.त्या वेळी विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या काही कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी वाहनांची तोडफोड करून एका ठिकाणी घर जाळल्याचा प्रकार घडला होता . त्यातच एका कार्यकर्त्यांने पोलिस कर्मचारी यांच्यावर तलवार हल्ला करून जखमी केल्याचा प्रकार घडला होता.त्यामुळे तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.तसेच आंदोलनातील जमावाने विशाळगड परिसरातील दुकानाची केलेली तोडफोड 

त्याच प्रमाणे तेथील दर्ग्यावर केलेली दगडफेक व गजापूर येथे नागरिकांच्या घराची ,वाहनांची नुकसान करून बंदोबस्तावर असलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर केलेली दगडफेक आणि धक्का बुक्की या प्रकरणी शाहुवाडी पोलिस ठाण्यात जमाव बंदीचा भंग करत बेकायदेशीरपणे जमाव जमवून शस्त्र बाळगणे ,सरकारी कामात अडथळा निर्माण करणे,धार्मिक भावना दुखावणे ,जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे अशा विवीध कलमान्व्ये चार गुन्हे दाखल केले असून व्हिडीओ फुटेजच्या आधारे आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग द्वारे 21 जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यात अटक केलेल्यात 1)सुशांत आत्माराम सरदेसाई 2) गोपी कुंडलीक सरदेसाई 3) चेतन आनंदराव जाधव 4)ओंकार दादा साळवे 5) प्रेम पंडीत पाटील 6)रोहन पांडूरंग पाटील 7)दिपक तानाजी सोळवंडे8)नितीन बाबूराव वरपे 9)प्रकाश गणपती मोरबाळे 10)मधुकर बब्रुराव गुरव 11)सिध्दार्थ धोंडिराम कटकधोंड 12)सुरज माणिक पाटील 13) सुशांत दिनकर उलपे 14)आदित्य  उलपे 15)मधुसुदन प्रताप भोई 16) ओंकार सुनिलसिंह राजपूत 17) ओंकार तुकाराम चौदाळ 18)योगेश चंद्रकांत भाट 19)योगेश चांगदेव पाटील 20)महेश आनंदा पाटील 21) सचिन विठ्ठल संकपाळ यांचा समावेश आहे.तसेच सामील असलेल्यांची पोलिसांनी धरपकड चालू केली आहे.

कालच्या घटनेत बंदोबस्तासाठी असणारे गडहिंगलज विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे -पाटील यांच्यासह शहर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके ,शाहुवाडीचे उपविभागीय पोलिस अधिकारी आप्पासो पवार ,पोलिस निरीक्षक विजय हेगडे ,संजीवकुमार झाडे ,सुशांत चव्हाण ,सहा .पोलिस निरीक्षक रणजित पाटील,मददसूर शेख,पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे ,अमित पाटील ,पोलिस विठ्ठल बहिरम,बालाजी पाटील,रोहित मर्दाने आणि जगताप हे जमावांनी केलेल्या दगडफेकीत जखमी झाले आहेत.सदर गुन्ह्यात सामील असलेल्या आरोपीची ओळख व्हिडीओ फुटेजच्या माध्यमातून घेण्याचे काम चालू आहे.

सदर घटनेच्या अनुशंगाने कोणीही आक्षेपार्ह सोशल मिडीयावर पोस्ट   प्रसारीत केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाच्या वतीने सांगितले.

तसेच विशाळगडसह कोल्हापूर जिल्ह्यात पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात केला असून जिल्हयात शांतता आहे.नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेऊ नये व शांतता राखण्याचे आवाहन पोलिस दलाच्या वतीने करण्यात येत असल्याचे सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post