तिघांना 3 दिवसांची पोलिस कोठडी.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि शहरात होत असलेली गाजांची विक्रीवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले होते.लक्ष्मीपुरी पोलिसांना लक्षतीर्थ वसाहतीत गाजांची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती.त्याच प्रमाणे वरील ठिकाणी काही जण गाजां ओढ़त असल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून तिघां जणांना अटक करून त्यांच्या कडुन दीड किलो गांजा ,तीन मोबाईलसह दोन मोटारसायकल असा पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी गाजांची विक्री करणारा अमित शंकर चौगुले (वय 32) आणि गाजांची तल्लप करणारे विनायक प्रताप पाटील (वय 28) आणि सचिन महादेव बेडेकर (वय 22 .रा.तिघेही गणेश नगर ,चंबुखडी) यांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
गांजाची चोरुन विक्री होत असल्याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली असता त्यांनी पोलिस पथके तयार करून कारवाई करण्याच्या पोलिसांना दिल्या होत्या.त्या प्रमाणे उपनिरीक्षक विठ्ठल जाधव,हवालदार मंगेश माने,तानाजी दावणे ,किशोर पवार ,संदिप पाटील,देवा बल्लारी ,अमित पाटील आणि अतुल पाटील यांनी कारवाई करुन या तिघांना अटक करून त्यांच्या कडील मुद्देमाल जप्त करण्यात आला.