विशाळगड येथे झालेल्या तोडफोड प्रकरणी पाचशे जणांच्यावर गुन्हा दाखल 21 जणांना अटक.

 

प्रेस मीडिया लाईव्ह

मुरलीधर कांबळे

कोल्हापूर- रविवार दि.14 जुलै रोजी विशाळगड येथे विविध ठिकाणाहून कार्यकर्ते मोठ्या संख्येने विशाळगडला रवाना झाले होते.त्या वेळी विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या काही कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी वाहनांची तोडफोड करून एका ठिकाणी घर जाळल्याचा प्रकार घडला होता.

त्यातच एका कार्यकर्त्यांने पोलिस कर्मचारी यांच्यावर तलवार हल्ला करून जखमी केल्याचा प्रकार घडला होता.त्यामुळे तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.तसेच आंदोलनातील जमावाने विशाळगड परिसरातील दुकानाची केलेली तोडफोड त्याच प्रमाणे तेथील दर्ग्यावर केलेली दगडफेक व गजापूर येथे नागरिकांच्या घराची ,वाहनांची नुकसान करून बंदोबस्तावर असलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर केलेली दगडफेक आणि धक्का बुक्की या प्रकरणी शाहुवाडी पोलिस ठाण्यात जमाव बंदीचा भंग करत बेकायदेशीरपणे जमाव जमवून शस्त्र बाळगणे ,सरकारी कामात अडथळा निर्माण करणे,धार्मिक भावना दुखावणे ,जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे अशा विवीध कलमान्व्ये चार गुन्हे दाखल केले असून व्हिडीओ फुटेजच्या आधारे आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग द्वारे 20 जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यात सामील असलेल्यांची पोलिसांनी धरपकड चालू केली आहे.

1] सुशांत आत्माराम सरदेसाई, वय २८, रा.बालाजीनगर कणेरीवाड़ी ता. करवीर

২) गोपी कुडलिक सुर्यवंशी वय ३०, रा. कागदेमाळ, गोकुळशिरगाव ता. करवीर

३] चेतन आनंदराव जाधव वय ३० , रा.७१०,ईवॉर्ड, लाईनबडझार कसबाबावडा ता करवीर

४ ओंकार दादा साबळे वय २१,रा. चौगले गल्ली कसबाबावडा ता करवीर

५] प्रेम पंडीत पाटील वय २१ , जयभवानी कॉलनी ,कसबाबावडा, कोल्हापुर

६ रोहन पांडुरंग पाटील वय २५, रा. गोळीबार मैदान कसबाबावडा कोल्हापुर

७] दिपक तानाजी सोळवंडे, वय २६, रा. गोळीबार मैदान, नेजगाव कॉलनी कोल्हापुर,

८] नितीन बाबुराव वर्षे वय ५१,रा.शिक्षक कॉलनी, आमराई रोड,इचलकरंजी ता. हातकणंगले कोल्हापुर (

९) प्रकाश गणपतराव मोरबाळे वय ४७, रा. प्लॉट नंबर ४, जिजामाता सोसायटी जवाहरनगर इचलकरंजी , ता.

१०] मधुकर बब्रुवान गुरव वय ४५,रा.गावभाग महादेव मंदीर जवळ, इचलकरंजी ता. हातकणंगले (

११] सिध्दार्थ धोडीबा कटकधोड वय ३०, रा.२८३२ बी वॉर्ड, घणभाग,जवाहरनगर, ता.करवीर,

१२] सुरज मानिक पाटील वय २९, रा. चावडी गल्ली कसबाबवाडा, कोल्हापुर

१३] सुशांत दिनकर उलपे वय २६,रा. कुलपेमळा कसबा, बावडा कोल्हापुर

१४] आदित्य अविनाश उलपे वरय २९, रा.२७० इ वॉर्ड उपले गल्ले कसबा बावडा कोल्हापूर

१५] मधुसुदन प्रताप भोई वय ३५ रा. १७/३५८ मुरदंडे मळा गल्ली नं १ इंचलुकरंजी

१६] ओंकार सुनिलसिंह राजपूत वय २९ रा ई वबॉर्ड जाधववाडी,मार्केट यार्ड कोल्हापूर

१७] ओकार तुकाराम चौगुले वय २१ रा.गुरव गल्ली, गोकूळ शिरगाव जि.कोल्हापूर

१८) योगेश चंद्रकांत भाट वय ३३ रा टेबलाईवाडी,घाडगे पाटील समोर उचगाव कोल्हापर

१९] योगेश चांगदेव पाटील वय ४३, रा गणेशनगर २२/८१४ इंचलकरंजी ता. हातकणंगले.२० महेश आनंदा पाटील वय २२ रा गुरवगल्ली गोकृव्ळ शिरगाव ता. करवीर जि. कोल्हापूर

20 ) सचिन विठठल संकपाळ वय ४२ रा.गुरव गल्ली गोकूळ शिरगाव ता. करवीर

कालच्या घटनेत बंदोबस्तासाठी असणारे गडहिंगलज विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे -पाटील यांच्यासह शहर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके ,शाहुवाडीचे उपविभागीय पोलिस अधिकारी आप्पासो पवार ,पोलिस निरीक्षक विजय हेगडे ,संजीवकुमार झाडे ,सुशांत चव्हाण ,सहा .पोलिस निरीक्षक रणजित पाटील,मददसूर शेख,पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे ,अमित पाटील ,पोलिस विठ्ठल बहिरम,बालाजी पाटील,रोहित मर्दाने आणि जगताप हे जमावांनी केलेल्या दगडफेकीत जखमी झाले आहेत.

सदर गुन्ह्यात सामील असलेल्या आरोपीची ओळख व्हिडीओ फुटेजच्या माध्यमातून घेण्याचे काम चालू आहे.

सदर घटनेच्या अनुशंगाने कोणीही आक्षेपार्ह सोशल मिडीयावर पोस्ट   प्रसारीत केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाच्या वतीने सांगितले.

तसेच विशाळगडसह कोल्हापूर जिल्ह्यात पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात केला असून जिल्हयात शांतता आहे.नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेऊ नये व शांतता राखण्याचे आवाहन पोलिस दलाच्या वतीने करण्यात येत असल्याचे सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post