प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- मोबाईल मिळवून देण्याचे आमिष दाखवून 14 जणांची 15 लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी आणखी एकास अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 16 तारखे पर्यंत कोठडी सुनावली आहे .
त्या संशयीताचे नांव गणेश जाधव (नंदनवन पार्क,कोल्हापूर ) असे आहे . याला पोलिसांनी अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 16 तारखेप्रर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.या प्रकरणी उमेश भोसले (रा.कोडोली )यांनी फिर्याद दिली होती.या दोघं लक्ष्मीपुरी आणि राजारामपुरीतील मोबाईलच्या दुकानात मोबाईल घेण्यासाठी येत असलेल्या कस्टमरला कर्ज मिळवून देत होते.त्या साठी ते 25% कर्जातील रक्कम कट करून बाकीची रक्कम परत देत होते.आणि मोबाईल नंतर मिळेल असे सांगून मोबाईल देण्याचे टाळत होते .या मुळे ज्यांना कर्ज लोन पास झाले त्यांच्याकडे कर्ज फेडी साठी फायनान्स कंपनी त्या व्यक्तीकडे हप्ता भरण्यासाठी फोन करून तगादा लावला जात होता.या फसवणूकीत आसपासच्या गावातील या 14 जणांचा समावेश होता.त्यानी दिलेल्या फिर्यादीने पोलिसांनी या दोघांना अटक केली.
अधिक तपास पोलिस निरीक्षक दिलीप पवार करीत आहेत.