प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - पन्हाळा तालुक्यातील नवलेवाडी येथे रहात असलेले सुरेश यशवंत खोत (वय 45) यांचा बुधवार दि.24/07/2024 रोजी सायंकाळी चारच्या सुमारास शिवाजी विद्यापीठ येथील परिक्षा भवन चौकात झालेल्या रोड अपघातात जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथे उपचार चालू असताना रविवार दि.28/07/2024 रोजी पावणे बाराच्या सुमारास मृत्यु झाला.
या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.यांच्या पश्च्यात आई वडील ,पत्नी ,एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
-----------------------------------------------------------
दाभोळकर कॉर्नर येथे मेडीकल मध्ये चोरी
कोल्हापूर - दाभोळकर कॉर्नर परिसरात असलेल्या जेनरिक मेडिकल शॉपचा कडी कोयंडा उचकटुन ड्रॉव्हर मधील 9 हजार 780 / रुपये चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे.हा चोरीचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला असून याची फिर्याद शिवाजी मोठे यांनी शाहुपुरी पोलिस ठाण्यात दिली आहे.