कोल्हापुरात पुराच्या पाण्यात वाढ़ झाल्यास वाहतुक नियंत्रण यंत्रणा तयार.

 वाहतूक विभागाकडुन पर्यायी मार्गाची व्यवस्था.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर-कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात पावसाचा जोर वाढ़त असल्याने काही ठिकाणी मार्ग बंद होत आहेत.त्यामुळे वाहनधारकाना पर्यायी मार्गाने अवलंब करावा लागतो.या साठी वाहतुक नियंत्रण पोलिसांनी नियोजन केले आहे.2021 च्या नियोजना नुसार नियोजन केले आहे.असे शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी प्रसिध्दी पत्रकानव्ये दिली.

जर 38फुटा प्रर्यत पाण्याची पातळी वाढ़ली तर छत्रपती शिवाजी पूल ते गायकवाड बंगला हा मार्ग बंद होतो.सध्या हा रस्ता दोन्ही बाजूला बँरिकेट्स लावून शिवाजी पूल,तोरस्कर चौक ,सीपीआर मार्ग पुढ़े वाहतुक वळविली आहे.43 फुट पाण्याची पातळी वाढ़ल्यास सुतारवाडा ते जयंती नाला ते व्हिनस कॉर्नर या मार्गावर बँरिकेट्स लावून मार्ग बंद केला जातो.


45 फुटा प्रर्यत पाण्याची पातळी वाढ़ल्यास क.बावडा ते शिये रोडवर पाणी येत असल्याने हा मार्ग बंद केला जातो.त्याच प्रमाणे रिलायन्स मॉल ते कांदा बटाटा मार्केट ,कामगार चाळ आणि कुंभार गल्लीत पुराचे पाणी येते.46.5फुटा प्रर्यत पाण्याची पातळी वाढ़ल्यास व्हिनस कॉर्नर ते एस.एस.कम्युनिकेशन हा मार्ग बंद होतो.49 फुटा प्रर्यत आल्यास कदमवाडी,मुक्तसैनिक वसाहत,गणेश पार्क आदी मार्ग बंद होतात.51.फुट तावडे हॉटेल ते शिरोली टोलनाकासह कोल्हापूर कमान हा मार्ग बंद होतो.53 फुटा प्रर्यत पाण्याची पातळी वाढ़ल्यास पुर्ण शहरासह बसंत बहार रोड ते जिल्हाधिकारी कार्यालय ते आसपासची नागरी वस्तीला पाण्याचा वेढ़ा पडलेला असतो.

  ---------------------------------------

  पुराचे पाणी नागरी वस्तीत शिरल्यास वाहने पार्किंगसाठी छत्रपती शाहु हायस्कूल,प्रायव्हेट हायस्कूल ,निर्माण चौक ,पेटाळा,केशवराव भोसले नाट्यगृह,जाधववाडी ,कनाननगर चर्च ,दसरा चौक आणि महावीर कॉलेज आदी ठिकाणी सोय केली आहे.

-------------------------------'

Post a Comment

Previous Post Next Post