"ज्यानं जन्म दिला त्याच बापाने सख्या मुलीवर लैगिंक अत्याचार केल्या प्रकरणी नराधम बापाला 20 वर्षे सक्तमजुरी.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर -ज्यानं जन्म दिला त्याच नराधम बापाने सख्या मुलीवर लैगिंक अत्याचार केल्या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती कविता बी.अग्रवालसो यांनी आरोपी जगन्नाथ यशंवत आडके (वय47रा.गणपत्ती गल्ली ,कोडोली) याला 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. हा प्रकार दि.22/01/2020 रोजी कोडोली येथे गणपती गल्लीतील आरोपीच्या घरी घडला असून याची फिर्याद पिडीत मुलीची आई सौ.सुनिता जगन्नाथ आडके (वय 36) यांनी कोडोली पोलिस ठाण्यात दिली होती.

अधिक माहिती अशी की,आरोपी हा पत्नी आणि तीन मुली समवेत कोडोली येथे गणपती गल्लीत पार्थ काळे यांच्या घरी रहात असून पती पत्नी मोजमजूरी करीत होते.पिडीत मुलगी अंगणवाडी मध्ये शिकत असून दि.22/01/2020 रोजी पिडीत मुलीच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम असल्याने आई,मावशी ,मोठी बहिण व मामा  हे सर्व जण कार्यक्रम बघण्यास गेले होते.ते परत आल्या नंतर आज्जीच्या गावी राहिले होते.त्या वेळी पिडीत मुलीने आईला व मावशीला शु च्या ठिकाणी त्रास होत असल्याचे सांगत माझ्या पोटात दुखत असल्याचे सांगितले त्या वेळी आईने व मावशी तिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिने पप्पानी तिन वेळा केल्याचे सांगताच पिडीत मुलीच्या आईने पती जगन्नाथ यांच्या विरोधात कोडोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.कोडोली पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गु न्हा दाखल करून त्याच्या विरोधात न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते.हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती कविता बी.अग्रवालसो यांच्या कोर्टात चालुन सरकारी वकील म्हणून Ad.मंजुषा पाटील यांनी काम पाहिले या वेळी न्यायालयात पिडीत मुलीची ,आई ,मावशी ,मोठी बहिण आणि मामा यांच्यासह वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरुन सरकारी वकील यांनी केलेला जोरदार युक्तीवाद कोर्टाने ग्राह्य धरुन न्यायालयाने पोक्सो कायद्यानुसार आरोपी जगन्नाथ यशवंत आडके याला 20 वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार रुपयांचा दंड आणि दंड न दिल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.यातील दंडाची रक्कम पिडीत मुलीस देण्याचा आदेश दिला .

या गुन्हयांचा तपास कोडोली पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहा.पोलिस निरीक्षक सुरज बनसोडे यांनी केला असून याकामी सरकारी वकील Ad. मंजुषा पाटील यांनी काम पाहिले असून त्यांना पैरवी.पो.कॉ.रोहीणी खोत यांनी मदत केली.

Post a Comment

Previous Post Next Post